- यामध्ये आपण advance option stratagies शिकवणार आहोत - याचा उपयोग तुम्ही hedging मध्ये करणार आहोत.
- हेजिंग म्हणजे तुमच्याकडे असलेल्या वस्तूचा किंवा असेट चा एक प्रकारचा इन्शुरन्स असतो.
- तुमच्याकडे एखादी कार असेल आणि जर तुम्ही त्याचा इन्शुरन्स काढला असेल तर तुम्ही तुमच्या कारचे हेजिंग केले असा होतो.
- हेजिंग करण्याने आयत्या वेळी झालेल्या अपघाती परिस्थितीत होणारे नुकसान हेजिंग चा वापर केल्याने कमी करता येते.
- ऑप्शन ट्रेडिंग मध्ये हेजिंग चे एक उदाहरण पाहू. ऑप्शन्स ट्रेडिंग हे डेरीव्हेटिव सेगमेंट मध्ये मोडते आणि ऑप्शन हे मुख्यत्वे पोर्टफोलिओ ला हेज करण्यासाठीच बनवले आहेत.
- उदाहरण:
निफ्टी सध्या 21500 चालू असेल आणि तुमची अपेक्षा असेल की निफ्टी इथून खूप वर जाईल.तुमच्याकडे 7 ते 8 लाखाचा निफ्टी इंडेक्स रिलेटेड शेयर चा पोर्टफोलिओ असेल अन् तुम्हाला ही भीती आहे की मार्केट इथून खाली गेले तर मला लॉस नाही झाला पाहिजे तर अशा केस मध्ये तुम्ही निफ्टी चा 21500 चा एक पुट ऑप्शन काही रुपयांना इन्शुरन्स म्हणून खरेदी करून ठेवाल. ज्यामुळे मार्केट मध्ये अचानक आलेल्या क्रॅश पासून होणारे नुकसान कमी होईल.
मार्केट खाली जाताना तुम्ही घेतलेल्या पुट ऑप्शन मूळे फायदा होतो अन् तोच फायदा तुमच्या पोर्टफोलिओ मधून होणाऱ्या लॉस ला कॉम्पेनसेट करतो.
- ऑप्शन्स हेजिंग करून तुम्ही तुमचा लॉस 100 टक्क्यांवरुन 20 टक्क्यांवर आणू शकता.
- शेयर मार्केट मध्ये हेजिंग चा वापर कुठे कुठे होऊ शकतो.
- पोर्टफोलिओ चा लॉस कमी करण्यासाठी.
- फ्युचर घेतल्यावर / शॉर्ट केल्यावर लॉस कमी करण्यासाठी.
- ऑप्शन शॉर्ट केल्यावर लॉस कमी करण्यासाठी.